आमच्या आसवांना भावनेची किनार होती हर आसवाच्या प्रतिबिंबात तुझिच छाया होती तू होताच असा प्रत्येकासाठी जणु बालपणीच्या रेशीमगाठी ही सगळी मनं जिंकलीसच कशासाठी आज कुणीच नाही ह्यांवर राज्य करण्यासाठी तुझ्या विचारांनी प्रणित आम्ही ऊभे राहिलो तुझ्या प्रेमाच्या ढालीने सारी युद्धं लढलो रिता होता खांदा नेहमीच आमचा तुझ्यासाठी मनातल्या कलहास मोकळे करण्यासाठी आठवण येते बापाची किती वेळा म्हणालास आठवण कधीतरी आली का रे आईच्या मायेची आता प्रवास फार कठीण आहे तुझ्या आठवणी मनी बाळगून आहे पुढील जन्मी भेटलास जर कधी असा भेटू नकोस पुन्हा सोडून जाण्यासाठी
प्रणित
Updated: Jul 17, 2021
Comments